भावना
मनातल्या भावना, कागदावर उमटल्या,
शब्दांचा रुपात, त्या कवितेत समावल्या।
भावना व्यक्त करता करता, पान कधी संपलं, कळलंच नाही,
अन् शिक्षणाची लढाई लढता लढता, हसु कुठे हरवलं, कळलंच नाही।
लढाई नव्हती ती तलवारीनं, ना हातात मशालीनं,
पण झुंझ होती ती स्वताच्या, बुध्दिमत्ता अन् हुशारीनं।
ध्येय एकच होतं, लक्ष्य एकच होतं,
खुप पैसा कमवणं, मात्र तेवढंच ध्यानात होतं।
ज्याला विचारलं त्याने, असाचं सल्लाह् दिला,
पैसा कमव नाहीतं, आनंदं नाही मिळनार।
आज वाटतं का, का एेकलं लोकांचं,
अन् का त्या भावनांना, कोंडुन ठेवलं मनातच।
मन किंचाळत होतं, ओरडून ओरडून सांगत होतं,
"तुला हवं ते कर, तुला आवडतं ते कर"।
पण नाही ऐकलं त्याचं, नी निघून पडलो शोधात,
त्या अमूल्य पैश्याच्या, अन् त्याच्या मदतीने आनंदाच्या।
जे सुख मी शोधत होतो, ते तर मनातच लपलं होतं,
दुर्दैवं एवढंच की हे कळायला, आयुष्य सर्व लागलं होतं।
आज त्या सर्व भावना कागदावर उमटल्या,
अन् ह्या शब्दांच्या रूपाने, कवितेत समावल्या।
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro