बाबा?कोण?
मिरची खायला शिकवणारे
झुला नसतांना हाताने झुलवणारे
स्वतःच्या काळजावर दगड ठेवून
चूकीचं वागल्यावर शिक्षा देणारे...
आपल्या पिल्लूला कोपऱ्यात लपलेली बघून
तिला मनवणारे, रडताना हसवणारे.
माकोडा मच्छर चावायलाच हवे
ऊन पाऊस आणि थंड वारे
हे सगळं सहन करणे
असले धडे नकळत गणणे.
कधी कधी कोसळणं शिकवणे
त्यातून उठून पळायला धाडणे.
काही कठीण असलं तरी सहजपणे करणे
हे सगळं सांगणारे, शिकवणारे- ते बाबा!
स्वतः उन्हात तपणारे
आम्हाला सावलीत जपणारे.
असं कुठे वाचलं होतं...
प्रेम दिसायला तेवढंच कठीण, जेवढं ते मोठं
त्यांना बघून ते खरं वाटतं.
पहाटे कुत्र्यांचे भुंकणे असो
किव्हा वादळांचे गडगडणे
त्यांच्याच आवाजाचा दिलासा थांबवायचा रडणे.
जिद्द, हट्ट, बंड, नखरे सहणारे
आणी कधी आवश्यक असलेली अद्दल घडवणारे😅
पैशाने लाड पुरवता येतो;
पण प्रेमातील आवश्यक असलेल्या, त्यागाचा बळी जातो!
स्वतःच्या कपड्यातील खाच लपवत
मुलांना नवीन कपडे पूर्वत;
स्वतःच्या मनातील वादळे सारत
आमच्याकरता खांबा सारखे ताठ उभे राहणारे...
ते कोण? तर ते- बाबा!
प्रेम असलं तरी व्यक्त नाही करता येत
मात्र ते केवळ शब्दात; कृत्यात तर ते अवतरतंच.
पिटणारा... तर कधी आशिर्वादाचा हात
हा आम्हाला नेहमीच हवा.
तुमच्यासारखी अव्यक्त बिनशर्त ममता
सर्वांना जमली तर... कधीच नाही राहील कमतरता.
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro