दारु कि आई?
आईने ठेवला होता वटसावित्री व्रत
उपाश्यापोटी बाबांची वाट, बसली बघत.
दारी आले ते दारू पिऊन
तिच्या उपवासाचा मान हिरावून.
केली जेव्हा तिने विचारणा
तिच्यावर हात उद्गारुन केली गर्जना.
डोळ्यात अश्रू कोंबत बघत राहीली ती अट्टाहास...
तिचा केलेला तो उपवास
आणि बाबांच्या तोंडाचा तो नकोसा वास
आठवणींमध्ये सारीत झाले तिचे ही लग्न;
आयुष्यातले काही घटक झाले तिलाही संलग्न...
नवऱ्याच्या प्रेमाला ध्यानी ठेवत
त्याच्या तोंडी असलेला नकोसा वास विसरत...
जेव्हा मुलगा झाला मोठा
विसरू पहात होते ती दुःखांचा साठा.
की आला एके दिवशी तो दुर्वास
नकोश्या, अनपेक्षित मुलाच्या तोंडून, नाकास.
भारावून गेली...ती विचारत राहिली परमेश्वरास
काय प्रत्येक जन्मी होत राहील एका आईचा अट्टाहास?
काय तिचं दूध नाही मिटवू शकलं तहान?
काय तिचं मुख लपवत, जेव्हा होतं म्लान
केले तिने कुठली चूक?
काय ती असमर्थ ठरली मिटवण्यास भूक?
एवढं कसं सहज होतं विसरण्यास तिचं आक्रंदन!?
हा दिवस बघण्यास केले तिने सहन!?
एवढी वर्ष संसाराचा पाया चालवत
मुलांचे भविष्य मनी ठावत
काय झाला तिचा गैरसमज?
काय तिचे दुःख नेहमीच कमी होते मापिला?
काय तिचा पदर नेहमीच होता क्षुद्र अश्रू पुसायला?
काय तिचं प्रेम अपुरे होतं दुःख त्यांचे सारायला?
दारूचा तो पहिला घोट; बिडीचा तो पहिला ओढलेला धूर
तिच्या घामाचा प्रत्येक थेंब; तिने लावणीत वाहिलेला रक्ताचा पूर...
या दोघांपैकी श्रेष्ठ काय?
विचारत राहिली ती माय?
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro