आता तरी
लहानाचे मोठे करत
स्वतः मात्र तरुणाचे वृद्ध होत
त्या त्यागी आई बापांना
आता तरी त्यांचं जीवन जगू दे.
किती वेळा तरी
आपली मनं मारत
तुझा मन राखलेल्या
त्या असीम मायेच्या सागरांना
आता तरी त्यांचं मन भरून जगू दे.
कधी नौकरी, कधी विनवणी
स्वतःच्या मानाचा धुत्कार करीत
तुझ्या अस्तित्वासाठी झुंज देणाऱ्या
अश्या त्या आई बापांना
आता तरी मान ताठ करून जगू दे.
स्वतःच्या दुःखाश्रुंना आवरत
तुझ्या प्रत्येक सुःखात हसत
तुझ्या सुःखाचा पाया टाकीत
अशा त्या आई बापांना
आता तरी
त्यांची भावना मनमोकळेपणे व्यक्त करत
जगू दे.
बारीक सारीक अशा किती हौसा
पूर्ण करण्याकरिता स्वतःचे कित्येक छंद विसरत जगणाऱ्या
अशा आई बापांना
आता तरी त्यांच्या हौसा पूर्ण करू दे.
प्रत्येक दुःखात खांबासारखे ताठ
पाठीशी उभे राहणाऱ्या
तुझ्या अश्रूंना स्वतःच्या डोळ्यात कोंबणाऱ्या
अशा त्या आई बापांना
आता तरी त्यांच्या डोळ्यातले अश्रू
तू पुसत त्यांना सुःखात जगू दे.
बाल्यावस्थेत भूक मिटवत
बालपणात खेळणं होत आणि पुरवत
किशोरावस्थेत बंड सहत
युवावस्थेत पैसे पुरवत
आता तरी प्रौढावस्थेत तू
अशा आई बापांना
अपेक्षातून मोकळा करीत
त्यांना तुझ्याशी अपेक्षा ठेवण्याचं
स्वातंत्र्य दे
त्यांना खुशाल जगू दे.
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro