6 का होतं हे असं? (cchinu)
काल जिथं ढोल ताश्यांचा कलरव होता
आज तिथं मात्र शांतता आहे
काल जे रस्ते लोकांनी वाहत होते
आज तिथे मात्र कोणीच नाही
काल हा अंधार दिव्यांनी उजळला होतं
आज इथे साधा चंद्र ही नाही
काल हे आकाश रोषणाईने सजलं होतं
आज इथे मात्र ढग ही नाही
काल जे डबे फराळाने भरले होते
आज त्यांच्यात एक दाणा ही नाही
काल जे घर लोकांनी उधळत होते
आज त्यांच्यात एक आत्मा ही नाही
काल ज्या चेऱ्यावर हसू नांदत होतं
आज अश्रूचा एक थेंब ही नाही
काल जे मन विश्वात रामलं होतं
आज ते स्वतःशी ही बोलत नाही
का होतं हे असं?
की सण साजरा करायला सर्व जग एकत्र येतं
पण मग मात्र कोणी कोणाला विचारात ही नाही?
का होतं हे असं?
Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro