Chào các bạn! Vì nhiều lý do từ nay Truyen2U chính thức đổi tên là Truyen247.Pro. Mong các bạn tiếp tục ủng hộ truy cập tên miền mới này nhé! Mãi yêu... ♥

ओनलाईन दुनिया

ऑनलाईन तर माझे खुप मित्र आहे
पण त्यातुन मला खरंच ओळखणारे, फार कमी।

ऑनलाईन तर मी सर्वांशी बोलतो
पण प्रत्यक्षात माझ्याशी बोलणारे, फार कमी।

म्हणून एक पाऊल मागे ठेउन
जेव्हा स्वताला निरखुन पाहतो।

तेव्हा जाणीव होते की
मी ऑनलाईनच जास्ती राहतो।

ते जग ज्याला आपण social म्हणतो
ते तर फक्त एक खेळ आहे।

त्या computer मधुन जेव्हा डोकं वर करतो
तेव्हा कळतं, खरं जग तर वेगळेच  आहे।

एक असं जग जिकडे आपण सर्व काही share करतो
पण त्या सगळ्यातनं भावना मात्र काढुन ठेवतो।

एक असं जग जिकडे आपण सर्व काही edit करतो
आणि ती एक like मेळवायला तिडा-तिडा मरतो।

हा पण एकटं असणं अगदीच वाइट नाही
असं मला तेव्हा वाटतं।

जेव्हा एका सुंदर पुस्तकात
माझं मन हरवतं।

पण जेव्हा मी मित्रां सोबत असतो
आणि तरीही तो एकलपणा जाणवतो।

तेव्हा फक्त एक उपाय असतो
तो phone स्वता: पासुन दुर करायचा असतो।

कारणावाचुन त्या phone कडे बघत राहण्या पेक्षा
समोरच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा असतो।

नव्या generation मध्ये
फक्त एक बदल झालाय।

आपला mobile स्मार्ट
आणी माणुस idiot झालाय।

म्हणूनच त्या phone मधनं बाहेर येउन बघा
आणि virtual पेक्षा खऱ्या जगात रहा।

***
माझा रोज हाच प्रयत्न असतो की ही कवितेचा स्वतः च्या जीवनात अमल करु।
पण काय करणार.....

Bạn đang đọc truyện trên: Truyen247.Pro